रिक्षा, टॅक्सी व विद्यार्थी वाहतूक व्यावसायिकांच्या अडचणींबाबत परिवहन मंत्र्यांचा शिष्टमंडळाला दिलासा

आ. राजन साळवींच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्रणित रिक्षा, टॅक्सी व विद्यार्थी वाहतूक सेनेच्यावतीने रिक्षा, टॅक्सी व विद्यार्थी वाहतूक व्यावसायिकांच्या अडचणींबाबत परिवहन मंत्री तसेच पालकमंत्री ऍड. अनिल परब यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी निवेदनातील प्रत्येक मुद्यावर ना. परब यांनी चर्चा करून अवगत करून घेतले व त्यावर कार्यवाही करण्याचे आश्‍वासन दिले. रिक्षा सेनेचे उपजिल्हा संघटक अविनाश कदम यांनी सांगितले की, लॉकडाऊन असल्यामुळे १ फेब्रुवारीनंतर संपलेल्या परवाना नुतनीकरणासाठी ३० सप्टेंबर पर्यंत सवलत दिली गेली असताना नुतनीकरणाची ऑनलाईन फी भरताना दंड वसूल केला जात आहे. त्यावर ना. परब यांनी दंड वसूल न करण्याबाबत त्वरित आदेश देऊन अंमलबजावणी करण्यात येईल असे आश्‍वासन दिले.
लॉकडाऊन काळात वाहन बंद असल्याने या काळातील रोड टॅक्स माफ व्हावा, विशेषतः टॅक्सी-विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने यांचे बंद काळातील सर्व टॅक्स माफ करावे याबाबत काही दिवसात सकारात्मक ठोस निर्णय घेवू असे ना. परब यांनी आश्‍वासन दिले. तसेच जसे बांधकाम मजुरांचे बोर्ड आहे त्या धर्तीवर रिक्षा व्यावसायिकांसाठी बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय घेऊ असे सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button