
एलटीटी ते रत्नागिरी एक्स्प्रेसच्या रेल्वे तिकिटांवरील सुपरफास्ट शुल्क रद्द
गणेशोत्सवाला कोकणात जाणार्या चाकरमान्यांसाठी रेल्वे गाड्या उशिरा सोडल्यामुळे रेल्वे कमी प्रतिसाद मिळत आहे आता तर सोडण्यात आलेल्या चार गणपती स्पेशल रेल्वे गाड्यांमध्ये ०११०७ एलटीटी ते रत्नागिरी एक्स्प्रेस ही रेल्वे गाडी सुपरफास्ट नसताना सुद्धा चाकरमान्यांकडून सुपरफास्टचा शुल्क आकारत असल्याची माहिती समोर आली आहे. ही बाब लक्षात येताच तात्काळ मध्य रेल्वेने या गाडीवरचा सुपरफास्ट शुल्क काढला आहे.कोकणात जाणार्या चार गाड्यांपैकी, ०११०७ लोकमान्य टिळक टर्मिनस- रत्नागिरी या गाडी सुपरफास्ट नसताना सुद्धा रेल्वेकडून प्रवाशांच्या तिकिटांवर सुपरफास्ट शुल्क लावून चाकरमान्यांची लूट सुरू होती. माहितीच्या अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वे मंत्रालयाने सांगितल्यानुसार, कोणतीही गाडी सुपरफास्ट होण्यासाठी तिच्या दोन्ही दिशांचा सरासरी वेग किमान ५५ किमी प्रतितास इतका असणे आवश्यक असते. परंतु, ०११०७ लोकमान्य टिळक टर्मिनस- रत्नागिरी या गाडीचा सरासरी वेग फक्त ४४ किमी प्रतितास आहे. ही गोष्ट लक्षात येताच मध्य रेल्वेने तत्काळ एलटीटी ते रत्नागिरी एक्स्प्रेसच्या रेल्वे तिकिटांवरील सुपरफास्ट शुल्क काढण्यात आले आहे.
www.konkantoday.com