शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी समस्त डॉक्टरवर्गाची माफी मागावी,इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) महाराष्ट्र शाखेची मागणी

डॉक्टरांबद्दल अत्यंत अवमानजनक वक्तव्य केल्याबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी समस्त डॉक्टरवर्गाची माफी मागावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) महाराष्ट्र शाखेने केली आहे. आयएमए कार्यकारिणीच्या झालेल्या बैठकीत राऊत याच्याबाबतच्या मागणीचा तसेच राऊत यांच्या निषेधाचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर, खासदार संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्यावरुन यु टर्न घेतल्याचं दिसून आलंसंजय राऊत यांनी माझ्यावर डॉक्टरांनीच उपचार केले आहेत, असे म्हटलंय.राज्यातील डॉक्टरांचा नाराजीचा सूर लक्षात येताच, संजय राऊत यांनी आपल्या विधानावरुन यु टर्न घेतला आहे. मी WHO बद्दल बोललो, याचा अर्थ इथल्या डॉक्टरांचा अपमान केला असं नाही, मी नेहमीच डॉक्टरांचा सन्मान केला आहे.दरम्यान, आयएमएच्या महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी लोकमतशी बोलताना म्हटले की, कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी डॉक्टर आज प्राणाची बाजी लावून काम करताहेत. अशा वेळी त्यांचे कौतुक करणे तर सोडाच, पण राऊत यांनी डॉक्टरांपेक्षा कंपाउंडरना जास्त कळते, असे म्हणणे निषेधार्ह आहे. डब्ल्यूएचओवरही त्यांनी केलेली टीका अत्यंत अनाठायी आहे. राऊत यांनी देशभरातील डॉक्टरांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी डॉक्टरांची माफी मागावी अशी आमची मागणी आहे. त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार करण्याबाबत आम्ही विचार करीत आहोत. आयएमएच्या राज्यभरातील २१६ शाखांतर्फे राऊत यांच्या निषेधाचे ठराव मंजूर करून ते राज्यपाल, मुख्यमंत्री आणि राज्यसभा सचिवालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचेही डॉ. भोंडवे यांनी म्हटले होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button