
राज्यात सोमवारी कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक
राज्यात सोमवारी कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून 11 हजार 391 रुग्ण बरे होऊन घरी गेले तर 8493 नवीन रुग्णांचे निदान झाले. आतापर्यंत एकूण 4 लाख 28 हजार 514 कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 70.9 टक्के एवढे आहे. सध्या 1 लाख 55 हजार 268 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात 228 मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर 3.35 टक्के एवढा आहे
www.konkantoday.com