जिल्ह्यातील शासकीय व खाजगी ग्रंथालये, वाचनालये तात्काळ सुरू करण्याची ज्येष्ठ नागरिकांची मागणी
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाचे कारण दाखवून एप्रिल महिन्यापासून बंद असलेली जिल्ह्यातील शासकीय, खाजगी वाचनालये, ग्रंथालये तात्काळ सुरू करावी अशी मागणी ज्येष्ठ नागरिक रविंद्र लक्ष्मण गोगटे यांनी केली आहे.
लॉकडाऊनच्या पहिल्या तीन टप्प्यात अनेक निर्बंध घालण्यात आले होते. एकाच वेळी लॉकडाऊन, संचारबंदी सुरू ठेवून सर्वसामान्यांनी घरीच थांबण्याची सक्ती करण्यात आली होती. लॉकडाऊनच्या तिसर्या टप्प्यापासून शिथिलता जाहीर करण्यात आली आहे.
www.konkantoday.com