
*चिपळूणच्या वडापावनंतर आता स्टेशन वरील भजीविक्रेत्याचा व्हिडिओ व्हायरल*
____चिपळूण रेल्वे स्थानकावर विक्रीसाठी वडापावावरच चक्क ठेवून झोपी गेलेल्या विक्रेत्याचे छायाचित्र सोशल मिडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर १५ दिवसांपूर्वी व्हायरल झाले असतानाच आता प्लॅटफॉर्मवरील प्लेवर ब्लॉकवर पडलेली भजी व त्यानंतर तीच भजी उचलून विक्रीसाठी निघालेला व्हिडिओ व्हायरल होवू लागला आहे. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी या विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.पंधरा दिवसापूर्वी चिपळूण रेल्वेस्थानकात एक परप्रांतीय विक्रेता चक्क वडातावावरच पाय ठेवून गाढ झोपी गेल्याचे छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल झाले. प्रवाशांच्या आरोग्याशी खेळणार्या या किळसवाण्या प्रकाराची छायाचित्रे सोशल मिडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्मवर चिपळूणचा वडापाव या टायटलखाली व्हायरल झाली. याबाबत सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर हा विक्रेता रातोरात रेल्वेस्थानक परिसरातून गायब झाला. त्यानंतर कोकण रेल्वे प्रशासनानेही चिपळूण रेल्वेस्थानक फलाटावरील वडापाव सेंटरला ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.पंधरा दिवसांपूर्वीची ही घटना ताजी असताना गुरूवारी दुसरा प्रकार उजेडात आला आहे. एक भजी विक्रेता हा प्लॅटफॉर्मवर असलेल्या बाकड्यावर झोपी गेला असून त्याच्या खाली पेव्हरब्लॉकवर अस्ताव्यस्त पडलेली भजी या व्हिडिओत दिसत आहेत. उपस्थितांनी या प्रकारचे छायाचित्रण सुरू केल्यानंतर थोड्या वेळाने जागे झालेल्या या विक्रेत्याने तीच लादीवर टाकलेली भजी परातीमध्ये घेवून ती पुन्हा विक्रीसाठी जात असतानाच एक रेल्वे पोलीस व काही प्रवाशांनी त्यांना याच भजीच्या विक्रीबाबत विचारणा करताना दिसत आहेत. ही भजी नंतर डस्टबीनमध्ये फेकून देण्यात आल्याचेही दिसत आहे. www.konkantoday.com