
कशेडी घाटात चाकरमान्यांची बस लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या टोळीच्या इतर सदस्यांना महाबळेश्वर येथे अटक
मुंबईतून कोकणाकडे गणपती उत्सवासाठी निघालेल्या गुहागर येथे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला कशेडी घाटात लुटण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता बसमधील प्रवाशाने सतर्कता दाखवून हा बस लुटण्याचा प्रयत्न हाणुन पाडला होता याप्रकरणी एका आरोपीला तात्काळ पकडण्यात आले होते उर्वरित ६ आरोपी फरार होते, त्या सहा आरोपींना महाबळेश्वर येथे अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे आली आहे. यामुळे या टोळीने आणखी काही गुन्हे केले असतील तर ते उघड होण्याची शक्यता आहे
www.konkantoday.com