
खासदार रवींद्र वायकर यांना चार आठवड्यात उत्तर देण्याचे कोर्टाचे आदेश.
लोकसभा निवडणुकीत मुंबई वायव्य मतदारसंघातील निकाल राज्यात सर्वाधिक गाजला होता. शिंदे गटाचे रवींद्र वायकर यांना विजयी घोषित केल्यामुळे ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.त्यावर उच्च न्यायालयाने शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना चार आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मुंबई वायव्यमधील वाद अजूनही धुमसत असल्याचे दिसून येत आहे.