माजी आमदार हुसैनभाई दलवाई उर्फ एच एम दलवाई यांचे ९९ व्या वर्षात पदार्पण
माजी आमदार हुसैनभाई दलवाई उर्फ एच एम दलवाई ९९ व्या वर्षात पदार्पण करत आहेत* दलवाई साहेबांनी१९६२ ते १९७८ असा दीर्घकाळ महाराष्ट्र विधानसभेत खेड मतदार संघाच प्रतिनिधित्व केला.७७-७८ मध्ये एक वर्ष महाराष्ट्राच कायदामंत्रीपद त्यांनी भूषविले .तद्नंतर मे १९८४ मध्ये त्यांची राज्यसभेवर निवड झाली आणि राज्यसभा सदस्यत्वाचा साडे पांच वर्षाचा कार्यकाळ शिल्लक असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी त्यांना डिसेंबर १९८४ मध्ये लोकसभा निवडणूक लढण्याचा आग्रह केला आणि त्या निवडणुकीत ते रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. होते
www.konkantoday.com