महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पायी चालत शिवनेरी किल्ल्यावर जाऊन दर्शन घेतले
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी रविवारी पायी चालत शिवनेरी किल्ल्यावर जाऊन दर्शन घेतले. पुणे दौऱ्यावर असलेल्या राज्यपाल कोश्यारी यांनी पायी चालत किल्ला सर करण्याची मानस बोलून दाखवला. महत्वाची गोष्ट म्हणजे वयाच्या ७९ व्या वर्षीही कोश्यारी यांनी शिवनेरी किल्ला पायी चालत सर केला. अशाप्रकारे पायी चालत शिवनेरी किल्ला सर करणारे कोश्यारी हे पहिलेच राज्यपाल ठरले आहेत. राज्यपालांचा फिटनेस पाहून या भेटीदरम्यान उपस्थित असलेले इतर अधिकारीही अवाक झाले.
शिवनेरी गडावर भेटीदरम्यान राज्यपाल कोश्यारी यांनी जिजाउ माँसाहेब आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं. याचसोबत गडावरील इतर ऐतिहासिक गोष्टीही राज्यपालांनी मन लावून पाहिल्या.
www.konkantoday.com