
मत्स्य शेती तलावाच्या लिलावाला प्रतिसाद नाही, व्यावसायिकांनी फिरवली पाठ
काही वर्षापूर्वी मत्स्य विभागाला लाखो रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळवून देणार्या तलावातील मत्स्य शेतीकडे छोट्या व्यावसायिकांनी पाठ फिरविली आहे. जिल्ह्यातील ४१ तलावांच्या लिलावातून वर्षाला सुमारे आठ लाखाचे उत्पन्न मत्स्य विभागाला मिळते. मात्र यावर्षी केवळ २३ तलावांचा लिलाव होवून पावणे चार लाखांचा महसूल मिळाला आहे. मत्स्य बिज तयार न होणे, तलावात सुक्ष खाद्य तयार न होणे, मागणी नसणे आणि मासे पकडण्यासाठी कामगार न मिळणे अशा अनेक अडचणींमुळे मत्स्य शेती अडचणीत सापडलेल्या ४१ तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात मत्स्य शेती केली जाते. त्यामध्ये कटला, कोळंबी, रोह आदी प्रकारची मत्स्य शेती घेतली जाते. हेक्टरी ३०० रुपये या प्रमाणे तलावाचा लिलाव होतो. सुमारे १०० ते १२० हेक्टरचे तलाव आहे.
www.konkantoday.com