मंदिरं आणि धार्मिक स्थळं सुरू व्हावी -रोहित पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे. राज्यातील मंदिरं आणि धार्मिक स्थळं खुली करण्याबाबत आपण पाठपुरावा करू असं आश्वासन रोहित पवार यांनी दिलं आहे.
“मंदिरं आणि धार्मिक स्थळं सुरू व्हावी असं माझंही म्हणणं आहे.कारण त्या भागात असलेल्या व्यवसायिकांची उपजीविका त्यावर अवलंबून आहे. तसंच लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. याबाबत मी नक्कीच पाठपुरावा करेन,” असं रोहित पवार म्हणाले. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.
www.konkantoday.com