जिल्ह्यात 100 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले एकूण पॉझिटिव्ह 2945 ,दोन रुग्णांचा मृत्यू ,बरे झालेले 1847
गेल्या 24 तासात जिल्हयात अन्टीजेन चाचणीत 57 तर आरटीपीसीआर चाचणीत 43 असे एकूण 100 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्हयातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2945 इतकी झाली. आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 3, कळबणी २, समाजकल्याण रत्नागिरी २४, घरडा, लवेल, खेड २ येथे उपचार घेत असताना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता 1847 झाली आहे.
पॉझिटिव्ह खालीलप्रमाणे दाखल
आरटीपीसीआर मधील
रत्नागिरी – 43
ॲन्टीजेन टेस्ट मधील
रत्नागिरी – 36
संगमेश्वर – 7
गुहागर – 2
देवरुख – 2
घरडा रुग्णालय – 10
एकूण 57 + 43 = 100 पॉझिटिव्ह रुग्ण आज नाचणे, रत्नागिरी येथील 72 वर्षीय कोरोना रुग्णाचा तसेच दापोली येथील 64 वर्षीय कोरोना रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. तसेच कर्टेल, खेड येथील ऍ़न्टीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या 68 वर्षीय कोरोना रुग्णाचा 16 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृत्यू संख्या आता 105 झाली आहे.
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 2945
बरे झालेले – 1847
मृत्यू – 105
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 993
संस्थात्मक विलगीकरण
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 44, समाजकल्याण, रत्नागिरी – 6, उपजिल्हा रुग्णालय, कामथे -48, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -27, कोव्हीड केअर सेंटर घरडा -5, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे – 7, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली – 20, गुहागर – 5, उपजिल्हा रुग्णलय दापोली – 1, पाचल -1असे एकूण 164 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
होम क्वॉरंटाईन
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या
45 हजार 195 इतकी आहे.
19 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह
केवळ 15अहवाल प्रलंबित
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 22 हजार 271 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 22 हजार 256 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत त्यातील 2945 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 19 हजार 299 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 15 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही.
15 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.
परराज्यातून व अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात दि. 16 ऑगस्ट 2020 अखेर एकूण 2 लाख 85 हजार 970 व्यक्ती दाखल झाल्या आहेत. तर रत्नागिरी जिल्हयातून इतर राज्यात तसेच इतर जिल्हयात गेलेल्यांची संख्या 1 लाख 24 हजार 773 आहे.
होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
www.konkantoday.com