गुहागर मधीलबँक संचालकासह तिघांचे फेसबुक अकाउंट हॅक करून पैशाची मागणी , पोलिसात तक्रार दाखल
गुहागर शहरातील चिपळूण अर्बन बँकेचे संचालक अजय खातू, पत्रकार मनोज बावधनकर आणि अमोल गोळे यांची फेसबुक अकाउंट शनिवारी रात्री हॅक झाली. हे तिघेही आपल्या फेसबुक फ्रेंडकडे पैशाची मागणी करत असल्याने हा प्रकार उघडकीस आला. याबाबत मनोज बावधनकर आणि अजय खातूंनी पोलीसांमध्ये तक्रार दाखल केली आहे.
शनिवारी (ता.15) रात्री शहरातील चिपळूण अर्बन बँकेचे संचालक अजय खातू, पत्रकार मनोज बावधनकर आणि अमोल गोळे यांच्या फेसबुक मित्रांना मेसेंजरवर संदेश येऊ लागले. या संदेशांमध्ये मला पैशांची गरज आहे. तातडीने पैसे पाठवून द्या. गुगल पे करणार की पेटीएमने करणार ते सांगा. समोरचा माणूस हिंदीत बोलत असल्याने त्यांच्या मित्रांना संशयाला त्यांनी हा प्रकार संबंधितांना सांगितला त्यानंतर तिघांचे फेसबुक अकौंट हॅक झाल्याचे समोर आले. या प्रकरणी मनोज बावधनकर आणि अजय खातू यांनी गुहागर पोलीसठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
www.konkantoday.com