खाजगी गाडीचालक आणि सरकारचं साटंलोटं असल्यामुळेच शासनाने जाणूनबुजून रेल्वे सेवा उशीरा सुरू केली-भाजप आमदार राम कदम
खाजगी गाडीचालक आणि सरकारचं साटंलोटं असल्यामुळेच शासनाने जाणूनबुजून रेल्वे सेवा उशीरा सुरू केली असल्याचा घणाघाती आरोप भाजप आमदार राम कदम यांनी केला. मुंबईत गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांची लाखोंच्या घरात संख्या आहे. परंतु, यंदा कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे शासनाने मोठ्या प्रमाणात या सणावर निर्बंध लादले आहेत. यामध्ये कोकणात गेल्यानंतर काही दिवसांचे क्वॉरंटाईन, कोरोना चाचणी बंधनकारक असे नियम होते. यामुळे कोकणात जाणाऱ्यांची काही दिवसांपूर्वी झुंबड उडाली होती. याचाच फायदा उठवण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला असल्याचं राम कदम म्हणाले आहेत.ज्यावेळी कोकणात जाणाऱ्यांना एसटी सेवा, रेल्वे सेवाची गरज होती. त्यावेळी राज्य सरकारने जाणूनबुजून रेल्वे सेवा उपलब्ध करून दिली नाही. त्यावेळी केंद्र सरकार राज्य सरकारला रेल्वे द्यायला देखील तयार होतं. याबाबत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी तशी तयारी देखील दर्शवली होती. परंतु, त्यावेळी राज्य सरकारने रेल्वेसेवा घेतली नाही. त्याचा फायदा खाजगी गाडी चालकांनी उठवला. खाजगी गाडी चालकांनी तिप्पट ते चौपट दर आकारून कोकणी बांधवांची लुबडणूक केली. यानंतर ज्यावेळी मोठ्या संख्येने कोकणी बांधव कोकणात खाजगी गाड्यांनी पोहचले. तेव्हा राज्य सरकारने रेल्वे सेवा कोकणी बांधवांसाठी जाहीर केली
www.konkantoday.com