संजय राऊत यांचे हे विधान म्हणजे कोरोना योद्ध्यांचा अपमान, भाजपकडून माफीची मागणी

डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडरला जास्त कळते, असे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केले. या विधानावरून भाजपा आक्रमक झाली आहे. संजय राऊत यांचे असे विधान कोरोना योद्ध्यांचा अपमान केला आहे. त्यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपाने केली आहे.यावेळी जागतिक आरोग्य संघटनेला काय कळतं? ती सीबीआयसारखीच आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे इकडून तिकडून गोळा केलेल्या माणसांचा एक गट आहे. त्यांच्यामध्ये डॉक्टर असले म्हणून काय झालं? खरंतर डॉक्टरांपेक्षा कम्पाउंडरला जास्त कळतं. मी कधीच डॉक्टरांकडून औषध घेत नाही. कम्पाउंडरकडून औषध घेतो. त्यांना जास्त कळतं. तुम्ही त्या डब्ल्यूएचओ वाल्यांच्या नादाला लागू नका. त्यांच्यामुळेच कोरोना वाढला आहे, असे विधान संजय राऊत यांनी केले.
दरम्यान, संजय राऊत यांच्या या विधानावरून भाजपा आक्रमक झाली आहे. कोरोनाच्या संकटात डॉक्टर हे देवदूत म्हणून काम करत आहेत. त्यांच्याबद्दल संजय राऊत यांनी असे विधान करणे म्हणजे डॉक्टरांचा फार मोठा अपमान आहे. त्यामुळे संजय राऊत यांनी राज्यातीलच नव्हे देशातील सर्व डॉक्टरांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजपाचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button