रत्नागिरीत भाजप नगरसेवकांच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मान

रत्नागिरी नगरपरिषदेतील भाजप नगरसेवकांच्या वतीने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नगरपरिषद व जिल्हा शासकीय रुग्णालयातील (कोविड रुग्णालय) कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. नगरपरिषदेच्या आवारात शासकीय नियम पाळून हा छोटेखानी कार्यक्रम झाला. या वेळी 35 कोरोना योद्ध्यांना उत्तम दर्जाचा स्टीमर, प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प देऊन गौरवण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात आता कोविड रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. उपचार सुरू असताना एखाद्या कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह अमरधामपर्यंत नेणे, त्याच्या अंत्यसंस्कार करणे आदी कामे हे योद्धे करतात. कोरोना महामारीच्या संकटकाळात अथक मेहनत घेणारे हे योद्धे सत्काराना भारावले. त्यामुळे त्यांचा सत्कार भाजप शहराध्यक्ष सचिन करमरकर, गटनेते व भाजप नगरसेवक समीर तिवरेकर, राजू तोडणकर, नगरसेविका सौ. सुप्रिया रसाळ, सौ. मानसी करमरकर, सौ. प्रणाली रायकर, नगरसेवक तथा तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, नगरसेवक तथा तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी, शहर सरचिटणीस राजेंद्र पटवर्धन व बाबू सुर्वे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्रम जैन, महिला मोर्चा शहराध्यक्ष राजश्री शिवलकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष ऐश्‍वर्या जठार, शिल्पा मराठे आदींच्या हस्ते सन्मान केला. द. रत्नागिरी भाजप जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला.
कोरोना योद्धा पालिकेतील ज्ञानेश कदम, प्रीतम कांबळे, संजय मकवाना, विशाल राठोड, अमित पोवार, नितीन राठोड, मनोहर कदम, जोगेंद्र जाधव, रूपेश सावंत, प्रभाकर कांबळे, योगेश मकवाना बबन बेटकर, हरीश जाधव, संदीप सावंत, संकेत कांबळे, प्रवीण जाधव, संतोष राठोड, नरेश राठोड, जितेंद्र विचारे, किरण सावर यांचा सत्कार केला. तसेच जिल्हा कोविड रुग्णालयातील नीलेश पाडावे, वैभव तेरवणकर, नीलेश तेरवणकर, सीयाद वस्ता, हरीश चौगुले, गोपाळ खांडेकर यांचा गौरव केला. या कार्यक्रमाला भाजप जिल्हा सचिव राजू भाटलेकर, दादा ढेकणे, संकेत बापट, मिलिंद साळवी, बंड्या भाटकर, श्री. लिंगायत आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button