
दापोली केळशी जवळ मच्छीमार बोट बुडाली चारजण खलाशी वाचले, एकाचा बुडून मृत्यू एक जण बेपत्ता
दापोली तालुक्यातील केळशी येथील समुद्रकिनारी , काल संध्याकाळी मासेमारीसाठी गेलेली बोट बुडाली. बोटीवरील सहापैकी चारजण वाचले असून, दोन जण बेपत्ता होते त्यापैकी एकाचा मृतदेह सापडला आहे तर एक अजूनही बेपत्ता आहे
केळशी येथील मकबुल शेखअली चाऊस यांच्या मालकीची माशाल्ला नावाची यांत्रिक बोट मासेमारीकरिता समुद्रात गेली होती. खाडीत परत येते वेळी वादळामुळे अचानक आलेल्या लाटांमुळे केळशी खाडीचे तोंडाजवळ नस्तावर बोट पलटी होऊन बुडाली.
बोटीवरिल ६ खलाशी पैकी ४ खलाशांना दुसऱ्या बोटीने वाचवण्यात यश आले आहे. अजून शादत बोरकर व गणी ख मसे हे २ खलाशी बेपत्ता झाले होते त्यापैकी बोरकर यांचा मृतदेह आता सापडला आहे असून दुसऱ्याचं शोध चालू आहे.
www.konkantoday.com