
छाटणी करताना वृक्ष मुळापासून उन्मळून पडल्याने टपऱ्यांचे नुकसान
खेड : खेड दापोली मार्गावरील तळ्याचे वाकण येथे छाटणी करत असतानाच वृक्ष मुळापासून उन्मळून पडल्याने दोन टपऱ्यांचे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही मनुष्यहानी झाली आहे.खेड नगपालिका हद्दीतील रस्त्यालगतच्या झाड्यांच्या फांद्या छाटण्याचे काम गेले काही दिवस सुरु आहे. आज सकाळी तळ्याचे वाकण येथे एका जुनाट वृक्षाच्या वाढलेल्या फांदा इलेक्ट्रिक कटरने छाटण्याचे काम सुरु होते. या दरम्यान जोराचा आवाज करत एक वृक्ष मुळापासून उन्मळून पडला. यामध्ये एका चायनिज आणि पालेभाजी विक्रीच्या दुकानाचे नुकसान झाले.
आज रविवार असल्याने ह्या दोन्ही टपऱ्या बंद असल्याने मोठा अनर्थ टळला. रविवार वगळता या दोन्ही दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी असते त्यामुळे ही दुर्घटना इतर दिवशी घडली असती तर मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती.
www.konkantoday.com