चिपळूण नगरपालिकेने कोविड सेंटर सुरू करण्याची माजी आमदार रमेश कदम यांची मागणी
चिपळूणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून नागरिक भीतीखाली आहेत. अशा वेळी आपली तपासणी होण्यासाठी किंवा दाखल होण्यासाठी नागरिक कामथे रुग्णालयात धाव घेतात. मात्र तेथे बेड उपलब्ध नसल्याने आपल्या प्रकृतीची काळजी घेण्यासाठी मुंबई, पुणे, सांगली, मिरज याठिकाणी नागरिकांना जावे लागत आहे. कोरोनाच्या या भयंकर संकटामुळे मुंबईसारख्या शहरातही बेड उपलब्ध होत नसल्याने अनेक लोकांचे प्राण दगावले आहेत. त्यामुळे नगरपरिषदेने शहरात तातडीने कोविड सेंटर, आयसीयू सेंटर, ऑक्सिजन आणि कार्डियाक रुग्णवाहिकेची व्यवस्था करावी, अशी मागणी माजी नगराध्यक्ष, माजी आमदार रमेशभाई कदम यांनी केली आहे
www.konkantoday.com