लोटे औद्योगिक वसाहतीतील पुष्कर कंपनीत अपघात, उपचारांदरम्यान जखमी कामगाराचा मृत्यू

खेड : रासायनिक कंपनीत मालाची ने-आण करताना पाय घसरून पडलेल्या कामगाराचे उपचारांदरम्यान निधन झाले. संजय सिताराम खेराडे असे या कामगाराचे नाव असून ही घटना लोटे औद्योगिक वसाहतीतील पुष्कर पेट्रोकेमिकल्स अँड फर्टिलायझर्स या कंपनीत घडली.
तालुक्यातील सोनगाव येथील संजय खेराडे हा मुंबईत नोकरी करणारा होता. कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये तो आपल्या कुटुंबासह मुळगावी आला होता. काही दिवस घरातच बसून काढल्यानंतर त्याने पंधरा दिवसांपुर्वीच पुष्कर पेट्रोकेमिकल्स अॅन्ड़ फर्टिलायडझर्स या कंपनीत मालाची ने-आण करण्याचे काम स्विकारले होते. मंगळवारी तो डोक्यावर ओझे घेऊन जात असताना फरशीवरून त्याचा पाय अचानक घसरला आणि तो फरशीवर पडला. डोक्यावर ओझे असल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दखापत झाली. जखमी झालेल्या संजय याला तात्काळ लवेल येथील घरडा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
बेशुद्धावस्थेत असलेला संजय उपचारांना साथ देत नसल्याने त्याला व्यवस्थापनाने कोल्हापूर येथील मेंदूरोग तज्ञाकडे हलविले. कोल्हापूर येथील एका खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारांदरम्यान त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे. संजय खेराडे यांच्या मृत्युने पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button