
जेष्ठ मराठी अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे आज पहाटे निधन
जेष्ठ मराठी अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे आज पहाटे निधन झाले. आई माझी काळूबाई या मालिकेच्या शूटिंग दरम्यान त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मालिकेतील तब्बल २७ जणांना कोरोनाचा ससंर्ग झाला आहे. या मालिकेत आशालता वाबगावकर यांची प्रमुख भूमिका होती. मालिकेच्या सेटवर त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर आशालता यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.
साताऱ्याजवळील वाई इथल्या हिंगोली गावात एक फार्महाऊसवर मालिकेचं शूटींग सुरु होतं.
www.konkantoday.com