![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2020/08/download-1.jpeg-60.jpg)
बस ने येणाऱ्यांना चाकरमान्यांना कोरोना टेस्ट ची सक्ती, तर रेल्वेने येणाऱ्यांना हमीपत्र, शासनाचे परस्पर विरोधी निर्णय
कोकणातील गणेशोत्सवाला सुरुवात होण्याआधी अनेक महिन्यांपासून कोकणातील अनेक संघटनांनी शासनाने एसटी बसेस व रेल्वे बस सुरू करावी अशी मागणी केली होती शासनाने सणाच्या तोंडावर एसटी बसची वाहतूक सुरू केली तर रेल्वेची वाहतूक आता सुरू होत आहे एकीकडे शासनाने बारा ऑगस्ट नंतर बसने येणाऱ्यांना कोरोना टेस्ट करण्याची सक्ती केली आहे तरच जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार आहे तर आजपासून सुरू होणाऱ्या रेल्वे प्रवाशांना टेस्ट करण्याची ची सक्ती नसून त्यांनी आपण आजारी नसल्याचे हमीपत्र द्यावयाचे आहे पन्नास वर्षाच्या वरील किंवा संशयास्पद रेल्वे प्रवासी आढळला तर त्याची एंटीजन टेस्ट घेण्यात येणार आहे यामुळे कोकणात एसटीने व रेल्वेने येणाऱ्या चाकरमान्यांना शासनाने वेगवेगळे नियम लावल्याने गोंधळ उडाला आहे शासन परस्पर विरोधी निर्णय जाहीर करत असल्याने चाकरमान्यांच्या तील गोंधळ अधिकच वाढला आहे याशिवाय रेल्वेने येणाऱ्यांना कोरं टाई न कालावधी बाबतही स्पष्ट खुलासा केलेला नाही त्यामुळे गणपतीच्या आदल्या दिवशीपर्यंत ट्रेनने येणाऱ्या चाकरमान्यांना दहा दिवस कोरन टाइ टाईन व्हावे लागले तर गणेशोत्सवाचा सण कसा साजरा करावयाचा असा प्रश्न पडला आहे
मुंबईहून रेल्वे गाडय़ांनी येणाऱ्या चाकरमानींची कोकणातील रेल्वे स्थानकांवर उतरल्यानंतर आरोग्य तपासणी केली जाणार असून आजारी नसल्याचे हमीपत्र घेतले जाणार आहे. मात्र गावी गेल्यावर त्यांच्या विलगीकरणाबाबत गोंधळाचीच परिस्थिती आहे.
रत्नागिरी जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार या रेल्वे गाडय़ांमधून येणाऱ्या चाकरमानींची नोंदणी आणि आरोग्य तपासणीसाठी रेल्वे स्थानकांवर आजपासून (१५ ऑगस्ट) खास पथके नियुक्त केली आहेत. त्याचबरोबर रेल्वे पोलीस दलाचेही सहाय्य घेण्यात येणार आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकात उतरणाऱ्या प्रत्येकाची थर्मल स्क्रिनिंगद्वारे तर ५० वर्षांवरील व्यक्तीची अँटीजेन तपासणी केली जाणार आहे.येणाऱ्या प्रत्येकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक घेतला जाणार असून ‘मला कोणताही आजार नाही’ अशा हमीपत्रावर सही घेण्यात येणार आहे.
मात्र, यापूर्वी राज्य शासनाने गणपतीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमानींना दहा दिवस विलगीकरण बंधनकारक केले आहे. तसेच, १२ ऑगस्टनंतर येणाऱ्या प्रवासी किंवा चाकरमानींना करोनाची बाधा नसल्याचा चाचणी अहवाल अनिवार्य केला आहे. उद्यापासून रेल्वेने येणाऱ्या चाकरमानींसाठी मात्र या संदर्भात कोणत्याही स्पष्ट सूचना आलेल्या नव्हत्या. त्यामुळे गावांमध्ये गोंधळ आणि प्रसंगी वादावादी होण्याचा धोका आहे.
www.konkantoday.com