आर्ट सर्कल आणि आसमंत बेलेव्होलन्स यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी भरवण्यात येणारी “माय फ्रेंड गणेशा” गणेश मूर्ती कला स्पर्धेचा निकाल जाहीर
आर्ट सर्कल आणि आसमंत बेलेव्होलन्स यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी भरवण्यात येणारी “माय फ्रेंड गणेशा” ही गणेश मूर्ती कला स्पर्धा नुकतीच 9 ऑगस्ट रोजी ऑनलाईन घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये रत्नागिरीमधल्या विविध शाळांचे मिळून पन्नासहून अधिक विद्यार्थी सामील झाले होते. या स्पर्धेमध्ये आठवी ते दहावी या गटामध्ये मृग्णेश पावसकर आणि स्वराज कदम या विद्यार्थ्यांना विभागून प्रथम क्रमांक तर पाचवी ते सातवी या गटामध्ये जीत कोसुंबकर या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे.
या स्पर्धेसाठी मूर्तीकार सिद्धेश देसाई यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले होते. योगायोगाची बाब म्हणजे, सिद्धेश देसाई हे याच गणेश मूर्ती बनवण्याच्या स्पर्धेचे विजेते ठरलेले होते. स्पर्धक ते परीक्षक हा त्यांचा प्रवास मुलांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या वर्षी ही स्पर्धा घेणे थोडे मुश्किल होते मात्र, टीम आर्ट सर्कलने आणि विविध शाळांमधील कलाशिक्षकांच्या सहाय्याने ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आली. यासाठी मुलांनी गूगल मीटमध्ये हजर राहून गणेशमूर्ती साकारली होती. त्यानंतर परीक्षकांनी मूर्तीचे परीक्षण करून विजेते जाहीर केले आहेत.
यावर्षी शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरही शाळा अद्याप सुरू न झाल्याने इतक्या मोठ्या प्रमाणावर एखादी शालेय स्पर्धा घेणे तसे जिकीरीचे काम होते. मात्र, मुलांनी तंत्रज्ञानासोबत दाखवलेली तत्परता, उत्साह आणि सर्व कलाशिक्षकांनी आर्ट सर्कलला दिलेली मोलाची साथ यामुळे ही स्पर्धा घेणे यावर्षी शक्य झाले आहे.
साल 2012 पासून आर्ट सर्कल आणि आसमंत बेनेव्होलन्स यांच्यामार्फ घेण्यात येणार्या या स्पर्धेचा उद्देश मुलांमध्ये पर्यावरण पूरक गणेशोत्सवाची रूजवात करणे, मातीची मूर्ती कमीतकमी संसाधनांमध्ये बनवून तिची पूजा करणे हा आहे. यावर्षी 2020 मध्ये शासनाने मूर्तीच्या उंचीवर आणि इतर अनेक घटकांवर बंधने घालून दिलेली आहेतच, मात्र या स्पर्धेमधून अशापद्धतीच्या इको फ्रेंडली मूर्ती आणि कमीतकमी पण नैसर्गिक सजावट यांचा विचार गेली आठ वर्षे सातत्याने करण्यात येत आहे.
याहीवर्षी अनेक अडचणी असूनही शाळाप्रमुख, कलाशिक्षक आणि पालक यांच्या पूर्ण सहकार्यामुळे मुलांनी अत्यंत उत्साहाने या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता.
या स्पर्धेमधील विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे:
मोठा गट: आठवी ते दहावी-
प्रथम क्रमांक (विभागून)
- मृग्णेश पावसकर – रा भा शिर्के प्रशाला- इयत्ता दहावी.
- स्वराज कदम – रा भा शिर्के प्रशाला- इयत्ता दहावी
द्वितीय क्रमांक (विभागून) - सूरज रामाणे – रा भा शिर्के प्रशाला- इयत्ता दहावी
- अद्वैता पावसकर – रा भा शिर्के प्रशाला- इयत्ता दहावी
तृतीय क्रमांक - सुचित सुवरे – जीजीपीएस हायस्कूल – इयत्ता आठवी
उत्तेजनार्थ - साहिल गुरव – पटवर्धन हायस्कूल – इयत्ता दहावी
- आनंद घाणेकर – संजीवन गुरूकुल, पटवर्धन हायस्कूल, इयत्ता दहावी
लहान गट (पाचवी ते सातवी)
प्रथम क्रमांक
- जीत कोसुंबकर – संजीवन गुरूकुल, पटवर्धन हायस्कूल, इयत्ता सातवी
द्वितीय क्रमांक
- रुद्र शिवगण – रा भा शिर्के प्रशाला, इयत्ता सहावी.
तृतीय क्रमांक
- हर्ष कुबडे – संजीवन गुरूकुल, पटवर्धन हायस्कूल, इयत्ता सातवी
- मनस्वी सावंत – संजीवन गुरूकुल, पटवर्धन हायस्कूल, इयत्ता सातवी
उत्तेजनार्थ
- जाह्नवी साने – सर्वंकष विद्यामंदिर – इयत्ता सातवी.
- श्रेया पाटील – जीजीपीएस हायस्कूल- इयत्ता पाचवी
www.konkantoday.com