आगामी काळात कोकणात राष्ट्रवादी, सेना व कॉंग्रेस या राजकीय पक्षांमध्ये समन्वय साधून ही मोट अधिक घट्ट करणार-खासदार सुनील तटकरे
राज्याचा सत्ताकारणात महाआघाडीच्या राजकारणाचा प्रयोग यशस्वी झाला आहे. आगामी काळात कोकणात राष्ट्रवादी, सेना व कॉंग्रेस या राजकीय पक्षांमध्ये समन्वय साधून ही मोट अधिक घट्ट करणार असल्याचे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने भिंगळोली येथील श्रीकृष्ण सभागृहात कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. श्री. तटकरे म्हणाले, कोकणातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यात महाआघाडीतील तिन्ही घटक पक्षांची समन्वयक समिती निर्माण करण्यात येईल. तिच्या माध्यमातून तिन्ही पक्षांची मोट घट्ट बांधण्याचे प्रामाणिक प्रयत्न करणार आहेत; मात्र असे करताना पक्षवाढीलाही महत्व दिले जाईल.
www.konkantoday.com