रत्नागिरी जिल्ह्यात 66 नवे पॉझिटिव्ह: एकूण 2747,बरे झालेले 1788,7 जणांचा मृत्यू

रत्नागिरी दि. 15 (जिमाका): गेल्या 24 तासात जिल्हयात अन्टीजेन चाचणीत 41 तर आरटीपीसीआर चाचणीत 25 असे एकूण 66 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्हयातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2747 इतकी झाली. आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 3, कामथे रुग्णालय 1 तसेच 3 रुग्ण होम ऑयसोलेशनमध्ये उपचार घेत असताना बरे झाला व घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता 1788 झाली आहे. तर 7 जणांचा मृत्यू झाला. यातील 4 कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील आहेत.

पॉझिटिव्ह खालीलप्रमाणे दाखल
आरटीपीसीआर मधील
रत्नागिरी – 25
ॲन्टीजेन टेस्ट मधील
रत्नागिरी – 18
राजापूर – 1
लांजा – 5
संगमेश्वर – 8
घरडा रुग्णालय – 9
एकूण 25 + 41 = 66 पॉझिटिव्ह रुग्ण आज प्राप्त माहितीनुसार 7 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यु झाला आहे. चिपळूण तालुक्यातील खिंडी येथील 65 वर्षीय रुग्णाचा तसेच डोकलवाडी येथील 65 वर्षीय महिला रुग्णाचा उपचार दरम्‍यान मृत्यु झाला. खेड तालुक्यातील भोस्ते येथील 65 महिला रुग्ण, खेड येथील 55 वर्षीय रुग्ण, आणि लोटे येथील 70 वर्षीय कोरोना रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यु झाला. दाभोळ, दापोली येथील 73 वर्षीय कोरोना रुग्णाचा आणि गवळीवाडा, रत्नागिरी येथील 72 वर्षीयकोरोना रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यु झाला. त्यामुळे एकूण मृत्यु संख्या आता 101 झाली आहे.

सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 2747
बरे झालेले – 1788
मृत्यू – 101
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 858

ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन (दि. १३ ऑगस्ट २०२० )
जिल्हयामध्ये 202 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 34 गावांमध्ये, दापोली मध्ये 10 गावांमध्ये, खेड मध्ये 47 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 7, चिपळूण तालुक्यात 89 गावांमध्ये,मंडणगड तालुक्यात 2 आणि राजापूर तालुक्यात 8, संगमेश्वर तालुक्यात 1, गुहागर तालुक्यात 4 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

संस्थात्मक विलगीकरण
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 29, समाजकल्याण, रत्नागिरी – 6, उपजिल्हा रुग्णालय, कामथे -48, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -23, कोव्हीड केअर सेंटर घरडा -4, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे – 7, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली – 20, गुहागर – 5, पाचल -1असे एकूण 143 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.

होम क्वॉरंटाईन (दि. 15 ऑगस्ट 2020 )
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 52 हजार 408 इतकी आहे.
18 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 21 हजार 865 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 21 हजार 292 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2747 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 18 हजार 533 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 573 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 573 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.
होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
सदरची आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोव्हीड-19 कक्षाकडून प्राप्त झाली आहे. ही माहिती दि.15 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंतची आहे.
०००

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button