
*चिपळूण लोटीस्माला कवी सौमित्र यांची भेट*____
प्रसिद्ध अभिनेते आणि नामवंत कवी सौमित्र तथा किशोर कदम यांनी नुकतीच येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या कलादालनाला भेट दिली.सौमित्र यांचे स्वागत संस्थेचे माजी अध्यक्ष अरूण इंगवले यांनी करत लोटिस्माच्या संदर्भ विभागातील ग्रंथांची माहिती दिली. मोठ्या शहरातही एवढा संदर्भ विभाग पहायला मिळत नसल्याचे कौतुकोदगार त्यांनी काढले. त्यांनी जे जे ग्रंथ पहायला मागितले ते सर्व तत्परतेने कर्मचार्यांनी दाखवले याचा आनंद व्यक्त करताना मला जेव्हा संदर्भाची आवश्यकता असेल तेव्हा मी नक्कीच पुन्हा इथे येईन, असे आवर्जुन सांगितले. www.konkantoday.com