रत्नागिरी जिल्ह्यात 101 नवे पॉझिटिव्ह ,एकूण पॉझिटिव्ह 2681,बरे झालेले 1781

रत्नागिरी गेल्या 24 तासात जिल्हयात अन्टीजेन चाचणीत 60 तर आरटीपीसीआर चाचणीत 41 असे एकूण 101 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्हयातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2681 इतकी झाली. आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 4, कोव्हीड केअर सेंटर घरडा 6, संगमेश्वर 1, तसेच 1 रुग्ण होम ऑयसोलेशनमध्ये उपचार घेत असताना बरे झाला व घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता 1781 झाली आहे.
पॉझिटिव्ह खालीलप्रमाणे दाखल
आरटीपीसीआर मधील
रत्नागिरी – 4
कळबणी – 13
गुहागर – 19
दापोली – 4
मंडणगड -१
ॲन्टीजेन टेस्ट मधील
रत्नागिरी – 27
कामथे – 20
राजापूर – 4
घरडा रुग्णालय – 9
एकूण 41 + 60 = 101 पॉझिटिव्ह रुग्ण
आज प्राप्त झालेल्य माहितीनुसार 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यु झाला आहे. रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील 75 वर्षीय रुग्ण, किर्तीनगर, रत्नागिरी येथील 58 वर्षीय रुग्ण आणि मिरकरवाडा,रत्नागिरी येथील 58 वर्षीय कोरोना रुग्णांचा उपचार दरम्यान मृत्यु झाला. त्यामुळे एकूण मृत्यु संख्या आता 94 झाली आहे.
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 2681
बरे झालेले – 1781
मृत्यू – 94
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 806
ॲक्टीव्ह कन्टेंनमेन्ट झोन (दि. १३ ऑगस्ट २०२० )
जिल्हयामध्ये 202 ॲक्टीव्ह कन्टेन्मेंट झोन असून रत्नागिरी तालुक्यात 34 गावांमध्ये, दापोली मध्ये 10 गावांमध्ये, खेड मध्ये 47 गावांमध्ये, लांजा तालुक्यात 7, चिपळूण तालुक्यात 89 गावांमध्ये,मंडणगड तालुक्यात 2 आणि राजापूर तालुक्यात 8, संगमेश्वर तालुक्यात 1, गुहागर तालुक्यात 4 गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.
संस्थात्मक विलगीकरण
संस्थात्मक विलगीकरणात रुग्णालयांची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – 27, समाजकल्याण, रत्नागिरी – 6, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – 50, उपजिल्हा रुग्णालय, कळबणी -24, कोव्हीड केअर सेंटर घरडा – 3, कोव्हीड केअर सेंटर पेढांबे – 7, कोव्हीड केअर सेंटर केकेव्ही, दापोली – 20, गुहागर – 5, पाचल -1असे एकूण 143 संशयित कोरोना रुग्ण दाखल आहेत.
होम क्वॉरंटाईन
मुंबईसह एम.एम.आर.क्षेत्र तसेच इतर जिल्हयातून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाईन केले जाते. आज अखेर होम क्वारंटाईन खाली असणांरांची संख्या 52 हजार 517 इतकी आहे.
18 हजार पेक्षा जास्त निगेटिव्ह
जिल्हा रुग्णालयामार्फत एकूण 21 हजार 576 नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 21 हजार 052 तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यातील 2681 अहवाल पॉजिटीव्ह आले असून 18 हजार 359 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. अजून 524 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झालेला नाही. 524 रत्नागिरी येथील प्रयोगशाळेमध्ये प्रलंबित आहेत.
होम क्वारंटाईन म्हणून शिक्का मारलेला कोणीही इसम बाहेर फिरताना दिसल्यास त्याबाबतची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षात ७०५७२२२२३३ हा व्हॉटसॲप क्रमांक, नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक ०२३५२-२२२२३३ व २२६२४८, आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्रात, पोलीस यंत्रणा अथवा ग्रामपातळीवर ग्राम कृति दलाना देण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button