
रत्नागिरी जिल्हा पर्ससिननेट मच्छीमार असोसिएशन, मिरकरवाडा,रत्नागिरी च्या कार्यालयाचे उदघाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते संपन्न
रत्नागिरी जिल्हा पर्ससिननेट मच्छीमार असोसिएशन च्या नुतन कार्यालयाचे उदघाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी मच्छीमार बांधवाना शुभेच्छा देताना मंत्री महोदय म्हणाले की, गेल्या हंगामात अनेक नैसर्गिक आपत्ती ना तोंड द्यावे लागल्याने अपेक्षित व्यावसायिक यश मिळाले नाही.या वर्षीच्या हंगामात निसर्गाची साथ सर्वांना मिळावी आणि चांगले व्यावसायिक यश सर्व मच्छीमार बांधवाना मिळावे आशा सदिच्छा व्यक्त केल्या. सोसायटीचे अध्यक्ष सुलेमान मुल्ला, उपाध्यक्ष नुरुद्दीन पटेल यांनी मंत्री महोदयांचे यथोचित स्वागत करून साहेबांनी आवर्जून वेळ काढून उदघाटन केल्या बद्दल धन्यवाद दिले. या कार्यक्रमाला लतिफ मालदार साहेब, नगरसेवक सोहेल साखरकर,आदर्श मच्छीमार सोसायटीचे चेअरमन इम्रान मुकादम, मदर मुकादम, विकास शेठ धाडस, नासिरशेठ वाघू,यासिन माजगावकर इत्यादी मच्छीमार बांधवांची प्रमुख उपस्थिती होती, तसेच मंत्री महोदयांसोबत नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्याशेठ साळवी, शिवसेना शहर अध्यक्ष बिपिन बंदरकर,शिवसेना उप जिल्हाप्रमुख संजूशेठ साळवी यांचीही उपस्थिती होती.
www.konkantoday.com