
नियुक्ती चिपळुणात, मात्र अधिकारी प्रतिनियुक्तीवर, मुंबईत पंचायत समिती सदस्य प्रताप शिंदे यांनी केला प्रकार उघड
चिपळूण तालुक्यात ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करणार्या पंचायत समितीमध्ये विविध विभागांत समितीमध्ये विविध भागात रिक्त पदे असताच एक आश्चर्य व्यक्त करणारा प्रकार समोर आला आहे. पं. स. मध्ये दोन अधिकार्यांची नियुक्ती दाखवून त्यांना मंत्रालय व कोकण भवनला प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आले आहे. दोन वर्षे झाली तरी त्यांची प्रतिनियुक्ती रद्द होत नसल्याने शिवसेनेचे तालुका प्रमुख व पं. स. सदस्य प्रताप शिंदे यांनी मासिक सभेत या विषयाला तोंड फोडत प्रशासनाच्या कारभाराचा समाचार घेतला.
www.konkantoday.com