
मिरकरवाडा मत्स्यबंदरातील किरकोळ मासळी विक्रेत्यांना मत्स्य विभागागडून कारवाईचा इशारा.
मिरकरवाडा मत्स्यबंदरातील किरकोळ मासळी विक्रेत्यांनी त्यांना नेमून दिलेल्या जागेतच बसावे अन्यथा कारवाई करण्याचा इशारा मत्स्यविभागाकडून देण्यात आला आहे.मिरकरवाडा बंदरात मासळी विक्रीसाठी किरकोळ व घाऊक विक्रेते अन्यत्र बसत असल्याचा प्रकार समोर आला होता. याची गंभीर दखल मत्स्यविभागाकडून घेण्यात आली आहे. पोलिसांचा बंदोबस्त लावून कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मिरकरवाडा बंदर परिसरात यासंबंधीची नोटीसा सर्वत्र लावण्यात आल्या होत्या. तसेच सोमवारी पोलिसांचा फौजफाटा बंदरात दिसून आला. नोटीसीमधील माहितीनुसार मिरकरवाडा मत्सबंदरातील किरकोळ मासळी विक्रेत्यांनी विक्रीसाठी मच्छिमार्केटमध्ये बसावे, तसेच घाऊक विक्रेत्यांनी त्यांना नेमून दिलेल्या जागी बसून विक्री करावी, अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.www.konkantoday.com