सरकारी नोकर असल्याचे सांगून महिलेची बारा लाखाची फसवणूक
आपण सरकारी नोकर आहोत असे सांगून रत्नागिरी तालुक्यातील चांदोर येथील गायत्री चांदोरकर यांची 12 लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरुन मधुकर दोरकर यांच्याविरुद्ध पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
यातील आरोपी मधुकर याने फिर्यादी गायत्री यांना आपण सरकारी नोकर असल्याची बतावणी करून त्यांचा विश्वास संपादन केला त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून गेल्या चार पाच महिन्यात रत्नागिरी शहरात विविध ठिकाणी त्यांचेकडून बारा लाख रुपये इतके पैसे उकळले या प्रकरणात आपली आरोपी मधुकर याने फसवणूक केल्याचे लक्षात येताच फिर्यादी गायत्री यांनी रत्नागिरी पोलिस स्थानकात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे
www.konkantoday.com