शोभिवंत मत्स्य उत्पादनाला भारतात मोठ्या संधी -कुलगुरू डॉ. संजय सावंत
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र झाडगांव रत्नागिरी येथे शोभिवंत मत्स्य पालन तंत्रज्ञान या विषयावर दोन दिवसीय निःशुल्क वेबपरिसंवाद आयोजित करण्यात आले होते.
तांत्रिक मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र डॉ. प्रकाश शिनगारे, डॉ. संतोष मेतर यांनी केले. कार्यक्रमाच्या सांगता समारंभावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी शोभिवंत मत्स्य पालनामध्ये देशात तसेच राज्यामध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध असून त्यासाठी लागणारी बहुतांशी साधन सामग्री परदेशातून आयात केली जाते. ती आपल्या देशात तयार व्हावी यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे नमूद करून आपल्याकडे जास्तीत जास्त माशांच्या जातींचे प्रजनन करून मत्स्य बीज शेतकर्यांपर्यंत नियमित पुरवठा करणे आवश्यक असल्याचे सुचविले. विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. पराग हळदणकर तसेच शिक्षण संचालक डॉ. नारखेडे यांनी मार्गदर्शन केले. या परिसंवादामध्ये डॉ. आसिफ पागारकर, डॉ. संतोष मेतर, श्री. नरेंद्र चोगले, श्रीमती वर्षा सदावर्ते, श्री. कल्पेश शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
www.konkantoday.com