
रिफायनरी प्रकल्पाच्या अनुषंगाने आता देवगड तालुका व्यापारी संघाने समर्थनार्थ पुढाकार घेतला
बहुचर्चित रत्नागिरी ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या अनुषंगाने आता येथील देवगड तालुका व्यापारी संघाने समर्थनार्थ पुढाकार घेतला आहे. रिफायनरी प्रकल्पासह विजयदुर्ग बंदर विकास होण्याकरिता तालुका व्यापारी संघाने पाठींबा देणारा ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे शासनाने याकरिता आवश्यक अधिसुचना पुन्हा प्रस्तावित करण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठवले आहे. निवेदन व्यापारी संघाच्यावतीने येथील तहसीलदार मारूती कांबळे यांच्याकडे सुपुर्त करण्यात आले.
www.konkantoday.com