राज्यभरातील बसस्थानक, आगार आणि कार्यालयांची स्वच्छता करणाऱ्या सफाई कामगारांचे गेल्या 10 महिन्यापासून वेतन रखडले
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या राज्यभरातील बसस्थानक, आगार आणि कार्यालयांची स्वच्छता करणाऱ्या सफाई कामगारांचे गेल्या 10 महिन्यापासून वेतन रखडले आहे. एसटीने स्वच्छतेसाठी ब्रिक्स कंपनीला काम दिले होते. मात्र कंपनीने या कामगारांना अद्याप वेतन दिले नसल्याने ऐन कोरोना महामारीच्या काळात या सफाई कामगारांवर आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आल्याने या कामगारांचे वेतन तातडीने देण्याची मागणी मास्कवादी कम्युनिस्ट पक्षाने परिवहनमंत्री अॅड. अनिल परब यांच्याकडे केली आहे.
www.konkantoday.com