भाजपकडून राज्य सरकारविरोधात जे काही राजकीय प्रयत्न सुरू आहेत, ते हाणून पाडण्यासाठी चर्चा-खासदार संजय राऊत
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बुधवारी भेट घेऊन चर्चा केली. केंद्र सरकार व भाजपकडून राज्य सरकारविरोधात जे काही राजकीय प्रयत्न सुरू आहेत, ते हाणून पाडण्यासाठी चर्चा केल्याचे राऊत यांनी सांगितले.
भाजप आमदार आशिष शेलार यांनी पवार यांची मंगळवारी भेट घेऊन चर्चा केली होती. ही भेट क्रिकेट संदर्भातील मुद्दयांवर होती, असे शेलार यांनी सांगितले असले तरी त्याबाबत राजकीय वर्तुळात आडाखे बांधले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राऊत यांनीही पवारांशी चर्चा केली. पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे देशातील व राज्यातील राजकीय घडामोडींवर चर्चा झाल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.
www.konkantoday.com