
परिवहन, संसदीय कार्ये मंत्री तथा पालकमंत्री ॲङ अनिल परब रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर
राज्याचे परिवहन, संसदीय कार्ये मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲङ अनिल परब जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार 13 ऑगस्ट 2020 रोजी सायंकाळी 5.00 वाजता शासकीय विश्रामगृह रत्नागिरी येथे आगमन, राखीव व मुक्काम.
शुक्रवार 14 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 11 ते 12 वाजता पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत भेट (स्थळ: शासकीय विश्रामगृह रत्नागिरी). दुपारी 12 ते 1.00 वाजता ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यासंदर्भात मा. लोकप्रतिनिधी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्या समवेत चर्चा. (स्थळ:शासकीय विश्रामगृह रत्नागिरी). दुपारी 2.00 वाजता जिल्हास्तरीय विविध समित्यासंदर्भात बैठक (स्थळ: शासकीय विश्रामगृह रत्नागिरी). दुपारी 3.00 वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठकीस उपस्थिती (स्थळ:अल्पबचत सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरी) सायंकाळी 6.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथून शासकीय मोटारीने शासकीय विश्रामगृह रत्नागिरीकडे प्रयाण आगमन व राखीव.
शनिवार 15 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 9.05 वाजता भारतीय स्वातंत्र दिनाच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ:पोलीस परेड ग्राऊंड रत्नागिरी) सकाळी 11 वाजता रत्नागिरी येथून मोटारीने मुंबईकडे प्रयाण.
www.konkantoday.com