दापोलीत तीन दिवसांत डेडीकेटेड कोविड सेंटर सुरू होणार, आ. योगेश कदम यांची माहिती

दापोलीः- (वार्ताहर)दापोली येथील उपजिल्हा रूग्णालयात येत्या तीन दिवसांत डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करणार असल्याची माहिती दापोलीचे आ.योगेश कदम यांनी दिली.
येथील उपजिल्हा रूग्णालयात 14 ऑगस्टपर्यंत डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू न केल्यास दापोली येथील तहसिलदार कार्यालयासमोर 15 ऑगस्टला लाक्षणिक उपोषणाचा इशारा दापोलीतील भाजपने दिला होता. या संदर्भात आ.कदम यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी दापोलीसाठी डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरला परवानगी मिळालेली असून येत्या चार दिवसात हे सेंटर दापोलीच्या उपजिल्हा रग्णालयात सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी कोणालाही उपोषणाला बसण्याची वेळ आपण येऊ देणार नाही असे सांगितले. तांत्रिक काम पूर्ण झाले असून आवश्यक औषधे व साधनसामुग्री येत्या दोन दिवसात आल्यावर लगेचच हे सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
दापोलीत किसान भवनातील कोविड केटर सेंटरमध्ये व्हेंटिलेटरची सुविधा नसल्याने तेथे दाखल झालेल्या रूग्णाला श्वास घ्यायला त्रास जाणवू लागल्यावर त्याला पुढील उपचारासाठी 170 किलोमीटर अंतर कापून रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात पाठविण्यात येते. प्रवासालाच तीन ते चार तास लागत असल्याने रूग्ण गंभीर अवस्थेतच जिल्हा रूग्णालयात दाखल होतो. काही रूग्णांचा उपचार घेत असतानाच रत्नागिरी येथे मृत्यु झाला होता. त्यामुळे दापोली येथे कोव्हिड हेल्थ सेंटरची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष श्री.केदार साठे यांनी शनिवारी 15 ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button