जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांना हिरवा कंदिल
जिल्ह्या बाहेर जाण्यास इच्छुक असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांना हिरवा कंदिल मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ३३० शिक्षक बदलीने परजिल्ह्यात जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या हजारावर पोचणार आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्याने त्याची झळ बसणार नसली तरीही आंतरजिल्हा बदलीने पात्र ठरलेल्यांना सोडण्यात आल्यास पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे आणखी काही महिन्यांनी शाळा सुरू झाल्यास अडचणी येऊ शकणार आहेत
www.konkantoday.com