
चाकरमान्यांना सोडून मुंबई येथे जाणाऱ्या गाडीला कामथे येथे अपघात
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथे मुंबईकर चाकरमान्यां ना सोडून परत जाणार्या ब्रेझा गाडीला कामथे येथे अपघात झाला ही गाडी मुंबईच्या दिशेने जात होती. ही गाडी कामथे येथे आली असता गाडी चालकाचा आपल्या गाडीवरील ताबा सुटल्याने ही गाडी नाल्यात जाऊन कलंडली. या अपघाताची माहिती मिळताच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अल्पसंख्याक सेल चिपळूण तालुकाध्यक्ष समीर काझी, हनिफ कोडविलकर, आदिल नाईक, बखतीयार मुल्ला, अमान बगदादी यांनी घटनास्थळी धाव घेऊन या चालकाला सुरक्षितरित्या गाडीतून बाहेर काढले.
www.konkantoday.com