कोकणसह अन्य नवीन विद्यापीठांच्या निर्मितीऐवजी सध्या विद्यापीठांचे विकेंद्रीकरणावर भर दिला जाणार– नामदार उदय सामंत
कोकणसह अन्य नवीन विद्यापीठांच्या निर्मितीऐवजी सध्या विद्यापीठांचे विकेंद्रीकरणावर भर दिला जाणार आहे असे उच्च तंत्रशिक्षण मंत्री नामदार उदय सामंत यांनी पुणे येथे सांगितले स्वतंत्र कोकण विद्यापीठ करण्यास तेथील अनेकांचा नकार आहे. त्यामुळे विद्यापीठांची उपकेंद्र चांगल्याप्रकारे विकसित केली जातील. त्याअनुषंगाने शैक्षणिक धोरणाचाही आधार घेतला जाईल. तज्ज्ञ समिती त्यावर अभ्यास करेल, असे सामंत यांनी नमुद केले.
महाविद्यालये बंद असून दुसऱ्या वर्षापर्यंतच्या परीक्षाही होणार नाहीत. त्यामुळे जिम, प्रयोगशाळा, ग्रंथालये बंद आहेत. देखभाल-दुरूस्तीचाही खर्च नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नये. तसेच प्रवेश शुल्कामध्येही या बाबींचा समावेश न करता केवळ शिक्षण शुल्क घेणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसू नये. याबाबत बैठक घेणार असून आठ दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.
www.konkantoday.com