
पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर, शरद पवारांचे धाकटे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नीचे निधन
पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे धाकटे बंधू उद्योगपती प्रतापवराव पवार यांच्या पत्नी भारती पवार (77 वर्षे) यांचे निधन झाले आहे.खासदार सुप्रिया सुळे यांनी पोस्ट करत ही माहिती दिली आहे. शरद पवार आणि प्रतापराव पवार हे सख्खे बंधू आहे.बारामतीचे पवार कुटुंब आणि त्यांचा गोतावळा फार मोठा आहे. वेगवेगळे भाऊ आणि त्यांची मुलं वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमध्ये आहेत. त्यापैकी प्रतापराव पवार आणि त्यांचे पुत्र अभिजीत पवार हे सकाळ माध्यम समूह चालवतात . प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार याचं पुण्यात निधन झालं आहे.
अतिशय दुःखी अंतःकरणाने कळविते की, माझ्या काकी भारती प्रतापराव पवार यांचे थोड्या वेळापूर्वी निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद घटना आहे. याक्षणी काकींच्या असंख्य आठवणींनी मनात घर केले आहे. त्या माझ्यासाठी आईसमान होत्या. त्यांनी आम्हा सर्व भावंडांवर सदैव खुप प्रेम केले. आम्हा सर्व भावंडांना त्यांनी दिलेली प्रेमळ साथ सदैव लक्षात राहील.
काकी, भावपूर्ण श्रद्धांजली.