रत्नागिरी जिल्ह्यात 96 नवे पॉझिटिव्ह,एकूण पॉझिटिव्ह 2487,बरे झालेले 1616


रत्नागिरी दि. 12 (जिमाका): काल सायंकाळपासून 96 नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2487 झाली आहे. आज जिल्हा शासकीय रुग्णालय येथून 10, कोव्हीड केअर सेंटर घरडा 5, उपजिल्हा रुग्णालय कळबणी 2, उपजिल्हा रुग्णालय कामथे 2 अशा 19 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचा संख्या आता 1616 झाली आहे.

पॉझिटिव्ह खालीलप्रमाणे दाखल
रत्नागिरी – 25
दापोली- 13
कामथे- 21
गुहागर – 26
देवरुख – 5
लांजा – 1
खाजगी प्रयोगशाळा 5 (चिपळूण – 1, खेड- 4)
आज प्राप्त झालेल्य माहितीनुसार 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रत्नागिरी तालुक्यातील कारवांचीवाडी येथील 53 वर्षीय महिला रुग्ण, शिवाजीनगर, रत्नागिरी येथील 68 वर्षीय महिला रुग्णांचा तसेच पुर्णगड, रत्नागिरी येथील 61 वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. तसेच खेर्डी, चिपळूण येथील 86 वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे.त्यामुळे एकूण मृतांची संख्या आता 87 झाली आहे.
मृत्यू चे प्रमाण 3.49 टक्के आहे.
सायंकाळची स्थिती खालीलप्रमाणे
एकूण पॉझिटिव्ह – 2487
बरे झालेले – 1616
मृत्यू – 87
ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह – 784
सद्या 784 ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.
आज संभाजीनगर, नाचणे, रत्नागिरी, नवलाईनगर नाचणे, रत्नागिरी, लक्ष्मी नारायणवाडी, कासरवेली, रत्नागिरी, जांभुळ फाटा, मिरजोळे, रत्नागिरी, भाटये मोहल्ला, रत्नागिरी, नागलेवाडी , आंम्बेशेत, रत्नागिरी,कुवारबाव, रत्नागिरी, बौध्दवाडी पोमेंडी बु, रत्नागिरी, निवळी तिठा, रत्नागिरी, करबुडे, मुळगांव, रत्नागिरी, शंकेश्वर मधुबन, माळनाका, रत्नागिरी, शासकीय कर्मचारी वसाहत, आरोग्य मंदीर, रत्नागिरी, जैन कॉलनी, थिबा पॅलेस रोड, रत्नागिरी, सिध्दीविनायक चौक, कोकणनगर, रत्नागिरी, शिवतिर्थ अपार्टमेंट, तेली आळी, रत्नागिरी, बयाबी मंजिल, अदमापूर,रत्नागिरी, संजिवनी नगर, गोळप, रत्नागिरी, कारंवाचीवाडी, महालक्ष्मी मंदीर समोर, रत्नागिरी, निसर्ग वसाहत, शांतीनगर, रत्नागिरी, जयगड, सडेवाडी, रत्नागिरी, विनम्रनगर, नाचणे, रत्नागिरी, साईसिध्दी अपार्टमेंट, शिवाजीनगर, रत्नागिरी, आठल्ये कॉम्प्लेक्स, गाडीतळ, रत्नागिरी, गोळप मोहल्ला, रत्नागिरी, रामविठ्ठल कॉम्प्लेक्स, टिळकआळी, रत्नागिरी हे क्षेत्र कोरोनाबाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button