महाविकास आघाडी सरकारने कोकणी माणसाचे हाल का केले- भाजप नेते आशिष शेलार
गणेशोत्सवासाठी रेल्वे विशेष गाड्या सोडायला तयार असतानाही त्या नाकारून महाविकासआघाडी सरकारने कोकणी माणसाचे हाल का केले, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी उपस्थित केला. गणेशोत्सवावासाठी कोकणात येणाऱ्या लोकांवर राज्य सरकारकडून क्वारंटाईनसह काही निर्बंध लादण्यात आले आहेत. यावरुन विरोधी पक्ष असलेला भाजप सातत्याने राज्य सरकारला लक्ष्य करत आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी आशिष शेलार यांनी ट्विट करुन सरकारला धारेवर धरले.आशिष शेलार यांनी म्हटले की, रेल्वेच्या विशेष गाड्या तयार असतानाही ठाकरे सरकारने आमच्या कोकणातील चाकरमान्यांसाठी का ही सुविधा उपलब्ध करुन दिली नाही?प्रचंड पाऊस, रस्त्यावरील खड्डे यामुळे चाकरमान्यांचे सरकारने यावेळी का हाल-हाल केले? ठाकरे सरकारने कोकणी माणसांवर कुठला आणि कसला हा राग काढला?, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला.
www.konkantoday.com