
जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्या संकल्पनेतून पोलिसांसाठी कोविड सेंटर
रत्नागिरी जिल्ह्यात पोलिस दलातील कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांच्यासाठी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे यांच्या संकल्पनेतून कोविड सेंटर सुरू होत आहे
रत्नागिरीत चोपन्न पोलीस कर्मचारी व कुटुंबीय कोरणा बाधित झाले होते सध्या अकरा कर्मचारी कोरोना बाधित आहेत त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र पन्नास बेडचे कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीण मुंढे यांनी स्वतः कोरोना वर मात करून ते सध्या परत कोरोना योद्धा म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहेत यामुळे पोलिस व कुटुंब यासाठी त्यांनी हे सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतला पोलीस मुख्यालय जवळील इमारतीत हे सेंटर सुरू होत आहे या ठिकाणी सध्या पॉझिटिव असलेले परंतु लक्षणे नसलेल्या पोलीस रुग्णांना ठेवण्यात येणार आहे याठिकाणी शासकीय रुग्णालयाच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू होणार असून शासकीय रुग्णालयाचे डॉक्टर दोन वेळा तेथे भेट देणार आहेत रुग्णाला गरज असल्यास शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे या सेंटरमुळे पोलिसांचेही मनोबल वाढणार असून शासकीय रुग्णालय वरील पण थोडा कमी होणार आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे
www.konkantoday.com