
सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यामुळे कोरोना लॅब अजुन नजरेच्या टप्प्यात नाही
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना लॅबसाठी शासनाने मंजूरी दिली असली तरी अद्याप मागविलेल्या मशिनरी प्राप्त झालेल्या नाहीत. यासाठी लागणारे अधिकारी-कर्मचारी आम्ही उपलब्ध स्टाफमधून दिले आहेत; मात्र त्यांची एनआयव्हीमार्फत आवश्यक असलेले प्रशिक्षण मशिदी त्यांना अद्याप मिळालेले नाही. ते केव्हा मिळेल? हे सांगता येत नाही. त्यामुळे कोरोना लॅब अजुन नजरेच्या टप्प्यात आली नाही, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात काल सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. चाकुरकर म्हणाले, “”कोरोना लॅबसाठी लागणारी मशनरी उपलब्ध होण्यासाठी एक एजन्सी नियुक्त केली आहे.
www.konkantoday.com