कोरोना रुग्णांची आर्थिक लूटमार रुग्णालयांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश -आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्यात अनेक ठिकाणी अवाजवी शुल्क आकारून कोरोना रुग्णांची आर्थिक लूटमार होत आहे. दरम्यान, आता ही लूटमार थांबवण्यासाठी आर्थिक लूट करणाऱ्या रुग्णालयांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शिवाय, या लुटमारीत डॉक्टरांचा सहभाग आढळल्यास त्यांचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला.
राज्यात खासगी रुग्णालयांच्या दरावर नियंत्रण आणण्यात आलं. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी आल्याने प्रत्येक रुग्णालयात लेखापरीक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. शिवाय, अवाजवी शुल्कवसुली केल्यास रुग्णांना पैसे परत देणे, दोषी रुग्णालयांवर गुन्हे दाखल करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
www.konkantoday.com