
रत्नागिरी जिल्ह्यात लेडीज ब्युटी ऍण्ड केअर असोसिएशनची स्थापना
रत्नागिरी जिल्ह्यातील असंघटीत लेडीज ब्युटी पार्लर व्यावसायिकांच्या न्याय्य हक्कांसाठी अनुभवी ब्युटीपार्लर व्यावसायिक एका छताखाली आले आहेत. या माध्यमातून प्रथमच लेडी ब्युटी ऍण्ड हेअर असोसिएशनची स्थापना केली असून रत्नागिरीच्या सौ. प्रगती वाजे यांची अध्यक्षपदी, दापोलीच्या निलम जाधव यांची उपाध्यक्षपदी तर रत्नागिरीच्या सौ. श्वेता पवार यांची सचिवपदावर वर्णी लागली आहे. याबरोबरच जिल्हा कार्यकारिणी पुढीलप्रमाणे-
सहसचिव डॉ. पुनम धारीया (खेड), खजिनदार सौ. दर्शना सुर्वे (लांजा), सदस्य सौ. मिनल आंब्रे चिपळूण), तर सदस्यपदी सौ. संपदा सरखोत (राजापूर), सौ. मधुरा नारकर (संगमेश्वर), सौ. सुरभि तांबडे (मंडणगड), अशी ११ लोकांची कार्यकारिणी तयार झाली आहे. यासाठी वृंदा शेट्ये, जान्हवी सावंत, आसावरी पवार, साजिदा भोसले, मुबशिरा धामस्कर, अनामिका कांबळे, अक्षता साळवी, सुकन्या देवरूखकर, कायनात खान, अवधुत कावतकर, सुप्रिया गुरव, मनस्वी तपकीर, तमिज मुल्ला यांनीही प्रयत्न केले.
www.konkantoday.com