
मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक आजपासून बंद
गणेशोत्सवानिमित्ताने सध्या कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे . याच पार्श्वभूमीवर चाकरमान्यांना प्रवास करताना अडथळा होऊ नये. यासाठी आजपासून मुंबई-गोवा महार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. रत्नागिरी पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक जास्त वाहतूक करणाऱ्या वाहनांवर बंदी घातली जाणार आहे. गणेशोत्सवात कोणताही अपघात होऊ नये म्हणून हा खबदारीचा उपाय करण्यात आला आहे.
www.konkantoday.com