
तिरुवनंतपुरम येथील एका शाळेची चक्क एआय शिक्षिकेची निर्मिती, वर्गात आली इरीस एआय टीचर; देशात पहिलाच प्रयाेग
साक्षरतेत आघाडीवर असलेल्या केरळमध्ये शिक्षण क्षेत्रात नेहमीच नवनवे प्रयोग केले जातात. अशातच तिरुवनंतपुरम येथील एका शाळेने चक्क एआय शिक्षिकेची निर्मिती केली आहे. ‘इरीस’ असे या देशातील पहिल्या एआय शिक्षिकेचे नाव आहे.तिच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या नव्यानव्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.तिरुवनंतपुरम येथील केटीसीटी उच्च माध्यमिक शाळेने मेकर्सलॅब एज्युटेक कंपनीच्या सहकार्याने रोबोटिक्स व जनरेटिव्ह एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने ‘इरीस’ची निर्मिती केली. इंटेल प्रोसेसर आणि डेडिकेटेड कॉम्प्रेसरमुळे शिक्षणाचा आगळावेगळा अनुभव विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. नीती आयोगाच्या २०२१ मध्ये सुरू केलेल्या ‘अटल टिंगरिंग लॅब’ (एटीएल) अंतर्गत हा प्रकल्प राबविण्यात आला. नुकतेच ‘इरीस’चे सादरीकरण करण्यात आले. काय आहेत वैशिष्ट्ये?- तीन वेगवेगळ्या भाषेत शिकविते; तसेच किचकट प्रश्नांचेही सहजतेने उत्तर दिले जाते.- व्हॉइस असिस्टंटच्या मदतीने संवादात्मक शिक्षणावर भर; नवतंत्रज्ञान आणि एआयबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. विद्यार्थ्यांशी संवादव्हॉइस असिस्टंट आणि जनरेटिव्ह एआयच्या मदतीने ‘इरीस’ विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देते. तसेच त्यांच्या शंकाचे निरसनही करते. विशेष म्हणजे ती वर्गात प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जाऊन त्यांच्याशी संवादही साधते.www.konkantoday.com